डिकसळ-कोंढार चिंचोली नवीन पुलाच्या कामाची संजयमामांनी केली पाहणी

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा दि.२४ - डिकसळ-कोंढार चिंचोली नवीन पुलाच्या कामाची संजयमामांनी केली पाहणी केली असून यावेळी त्यांच्यासोबत बारामती एग्रो साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे होते.करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील ३ जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पूल अनेक दिवस खचलेल्या अवस्थेत असून यामुळे यावरून जड वाहतूक बंद झाली होती.सदर पुलाची किरकोळ दुरुस्ती करून हलक्या वाहनांची वाहतूक सदर पुलावरून सुरु होती,परंतु करमाळा तालुक्यासह पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या तीन जिल्ह्याला जोडणारा हा पूल अत्यंत महत्वपूर्ण आहे.
 या डिकसळ पूलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून ५५ कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मिळवली होती. त्यानंतर युती सरकारने त्यावरती स्थगिती आणली. ती स्थगिती उठल्यानंतर जुलै २०२३ मध्ये सदर कामाची प्रशासकीय मान्यता मिळून २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.कामाची मंजुरी, त्यावरती दिली गेलेली स्थगिती, स्थगिती उठविणे, प्रशासकीय मान्यता, निधीची तरतूद, नैसर्गिक अडथळे (धरण भरणे) आदी अनेक कारणांमुळे या कामात अनेक अडथळे येत होते.संबंधित कामाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून या कामाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन डिकसळ पूल पाहणी प्रसंगी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.
यावेळी संबंधित ठेकेदाराचे मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल