निंभोरेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादप्रमाणे झाली साजरी

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- तालुक्यातील निंभोरे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादप्रमाणे साजरी करण्यात आली. निंभोरेचे आदर्श सरपंच रवींद्र वळेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली..
      यावेळी सरपंच रविदादा वळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत काही ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला. तसेच बाबासाहेब यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग सांगितले.
 सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, समाधान वळेकर, दत्ताभाऊ वळेकर, प्रविण वळेकर, ईश्वर मस्के,सोमा गुरव,नारायण गायकवाड, भगवान गायकवाड,प्रल्हाद गवळी,नितीन गायकवाड,बबलू कळसाईत, सत्यवान खाडे, युवराज गवळी,सुनिल धेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन गायकवाड,संदीप कळसाईत, सत्यवान खाडे, सुनिल धेंडे यांनी परिश्रम घेतले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)