पोटेगाव बंधारा दुरुस्ती,मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या अथक प्रयत्नाला अखेर आले यश...

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
 करमाळा:- पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम सुरु होणार असून मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या अथक प्रयत्नाला अखेर यश आले आहे.तालुक्यातील सीना नदीवरील पोटेगाव हा अत्यंत महत्त्वाचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये होता.या बंधऱ्याच्या दुरुस्तीच्या मंजुरीबाबत सविस्तर घटनाक्रम असा आहे.सिंचन बजेट मधून त्याला दुरुस्ती करण्यास निधी उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी विस्तार सुधार मधून त्याचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री धुमाळ यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी केली त्यानंतर प्रस्ताव दाखल होऊन २५ नोव्हेंबर २०२२ रोजी च्या कार्यकारी समितीच्या १६६ व्या बैठकीत सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन प्रस्ताव नियामक मंडळापुढे जानेवारी २०२३ मध्ये शासनास सादर करण्यात आला. 
         प्रस्ताव दाखल झालेला होता परंतु जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक होत नसल्यामुळे विषय प्रलंबित होता, त्यामुळे दिनांक ७ मार्च २०२३ रोजी फडणवीस साहेबांना आमदार संजय मामा शिंदे यांनी लेखी पत्र देऊन नियामक मंडळाची बैठक लवकरात लवकर घेऊन पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली होती.
         महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११०वी बैठक २८ डिसेंबर २०२३ रोजी झाली आणि त्यामध्ये ४१२.९२ लक्ष निधीला मंजूर देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग,शासन निर्णय क्रमांक: प्रमाप्र-२०२४/ (प्र.क्र.२१९/२०२४)/ सिंव्य दिनांक:- ७ ऑगस्ट, २०२४ रोजी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामाचे भूमिपूजन आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते १४ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले होते. त्यानंतर काही दिवसातच विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. 
         विधानसभेच्या निवडणुकीनंतर विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेमुळे हे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही.सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पोटेगाव बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू करणे विषयी विनंती केली. त्यानुसार सोमवार दि.२८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी पोथरे ,बिटरगाव श्री, तरटगाव ,निलज या ६ गावांना होणार असून एकूण ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
           पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी दिनांक २१ एप्रिल १९८१ च्या शासन निर्णयानुसार २४ लाख ६१ हजार इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता दिलेली होती. सदर काम जानेवारी १९८८ मध्ये सुरू होऊन ऑगस्ट १९९० मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाकडे सन १९९३ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्ती च्या प्रतिक्षेत होता. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून बंधार्‍याची दुरुस्ती होणार असल्यामुळे सिनेकाठचे शेतकरी शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
                               

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....