आदिनाथच्या निवडणुकीत मा. आ.राम सातपुतेंची एंट्री आज चिखलठाण येथे होणार जाहीर प्रचार सभा...

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- आदिनाथच्या निवडणुकीत मा. आ.राम सातपुतेंची एंट्री झाली असून आज चिखलठाण येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे अशी माहिती जेऊर ऊस उत्पादक गटाचे उमेदवार चंद्रकांत काका सरडे यांनी दिली आहे.
        आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा  प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडी कडून स्टार प्रचारक निवडणूक रिंगणामध्ये उतरविले जात आहेत. महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या आज चिखलठाण नं.१ येथे सायंकाळी ७.०० वाजता होणाऱ्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निकटवर्तीय माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामजी सातपुते हे आवर्जून उपस्थित राहणार असून, पाटील गटाचे मार्गदर्शक मोहिते पाटील असणाऱ्या अकलूजकरांवरती ते कोणती तोफ डागणार याची उत्सुकता आहे.
          आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतली असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण एक येथे येणार आहेत.या प्रचार सभेसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. त्यांच्याबरोबरच बारामती ऍग्रो चे व्हॉइस चेअरमन सुभाष गुळवे तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत. सदर सभेसाठी मोठ्या संख्येने चिखलठाण नंबर एक येथे उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन श्री चंद्रकांत सरडे यांनी केले आहे. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....