पोथर-निलज,पोटेगाव, बाळेवाडी, ,बिटरगाव श्री, तरटगाव या गावासाठी उपयुक्त अशा पोटेगाव बंधाऱ्याचे काम नारायण पाटील यांनी जाणीवपूर्वक अडकून ठेवले :-विनय ननवरे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- पोथरे -निलज,पोटेगाव, बाळेवाडी, ,बिटरगाव श्री, तरटगाव या गावासाठी उपयुक्त अशा पोटेगाव बंधाऱ्याचे काम नारायण पाटील यांनी जाणीवपूर्वक अडकून ठेवले असल्याची माहिती महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार विनय ननवरे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कि,करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पोटेगावच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस मान्यता मिळून बंधाऱ्याचे भूमीपूजन आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले होते.त्यानंतर सत्तापालट झाल्यामुळे या कामाला खीळ बसली .या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी पोथरे ,बिटरगाव श्री, तरटगाव ,निलज या ६ गावांना होणार असून एकूण ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम १९९० च्या दरम्यान पूर्ण झाले.तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्ती च्या प्रतिक्षेत होता. 35 वर्षाच्या कालावधीत अनेक आमदार खासदार होऊन गेले परंतु कुणालाही तो प्रश्न सोडवता आला नाही.असा जटिल प्रश्न संजयमामा शिंदे यांनी सोडवला, परंतु केवळ राजकीय कुरघोडी करण्याच्या हेतूने हे काम नारायण पाटील यांनी आडवून ठेवले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला मतदार संघाचे भले करता येत नसेल तरी किमान वाईट तरी करू नका.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीमध्ये विकास कामांचा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात आहे.2019 ते 24 या कार्यकाळामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून 3490 कोटीची विकास कामे मतदार संघामध्ये मंजूर केलेली होती त्यातील बरीचशी कामे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2025 मध्ये सुरू झाली.परंतु या विकास कामांमध्ये अडकाटी घालण्याचा प्रयत्न चालू आहे, याचाच एक भाग म्हणून पोटेगाव बंधाऱ्याचे काम आजवर सुरू नाही याचा पुरूच्चार असा सवाल महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार तथा बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांनी केला आहे.
      आ.नारायण पाटील यांनी रोखून धरलेले सदर बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आपण लवकरच मोठे जनआंदोलन उभा करू असा इशारा विनय ननवरे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल