आदिनाथ ला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध : मा.आ.संजयमामा शिंदे (पडेल ती किंमत मोजून सभासदांचा विश्वास यशस्वी करणार)

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा,प्रतिनिधी : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध असून याबाबत पडेल ती किंमत मोजून सभासदांचा विश्वास यशस्वी करु असे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.महायुती अजिनाथ बचाव पॅनलchya उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले कि,अडचणीतला कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याचा सभासदांना शब्द देऊन आदिनाथ कारखान्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे .यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांनी गट पक्ष सोडून राजकारण बाजूला ठेवून 
 संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेनुसार महायुती आदिनाथ बचाव पॅनलची निर्मिती झाली असून आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालून ऊस उत्पादक शेतकरी कामगार वाहतूकदार व आदिनाथ वर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकू मात्र आदिनाथ सक्षमपणे चालू करु असा शब्द संजयमामा शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे.आर्थिक अडचणीत संकटात असलेला आदिनाथ कारखाना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय ऊर्जेत अवस्थेत येऊ शकत नाही यामुळे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे.करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकाचे हित डोळ्यापुढे ठेवून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय अभिमानास्पद असून ते कारखान्याला निश्चितच गतवैभव प्राप्त करून घेतली असा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे अधिकृत उमेदवार 
🛑जेऊर गट 
 १)चंद्रकांत सरडे, २)प्रशांत पाटील, ३)प्रमोद बदे. 
🛑सालसे गट 
 १)विलास जगदाळे,२)नवनाथ जगदाळे,३)नागनाथ चिवटे 
🛑पोमलवाडी गट 
 १)दशरथ पाटील,२)नितीनराजे भोसले, ३)बबन जाधव 
🛑 केम गट 
 १)संजयमामा शिंदे, २)सोमनाथ देशमुख,३)सोमनाथ रोकडे
🛑 रायगाव गट 
 १)अभिजीत पाटील, २)आशिष गायकवाड, ३)विनय ननवरे 
🛑सहकारी संस्था - सुजित बागल.
 🛑अनुसूचित जाती जमाती - बाळकृष्ण सोनवणे
 🛑महिला राखीव - मंदाताई सरडे, शालन गुंडगिरे
 🛑इतर मागासवर्गीय - रोहिदास माळी 
🛑भटक्या जाती-जमाती - अनिल केकान .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....