करमाळा भुईकोट किल्ला संवर्धनाचे कामजोमाने सुरू : संजयमामांनी उपलब्ध करून दिला होता दोन कोटींचा निधी

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा(प्रतिनिधी):- करमाळा भुईकोट किल्ला संवर्धनाचे काम जोमाने सुरू असून यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तब्बल दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता.
राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येत असून या कामासाठी २ कोटी निधी मा.आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळामधून मिळविला होता.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला याची बांधणी राजे जानोजी,रंभाजी (रावरंभा) निंबाळकर यांनी सतराव्या शतकात केली. 
       सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारची बांधकामे ऑगस्ट २०२४ पासून सुरू आहेत.
 शहराचा हा ऐतिहासिक वारसा जतन होण्यासाठी या संपूर्ण किल्ल्याची डागडुजी होण्यासाठी आणखी करोडो रुपयांची गरज असून तो निधी संजयमामा शिंदे यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून राज्य सरकारकडून उपलब्ध करून द्यावा अशी शहरातील जाणकार,इतिहासप्रेमी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)