देवळालीत अध्यक्ष केसरी -२४ मार्चला रंगणार भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार...

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- भाजपा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या सन्मानार्थ सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी छत्रपती प्रतिष्ठान देवळाली आयोजित करमाळा तालुक्यातील मौजे देवळाली येथे अध्यक्ष केसरी नावाने भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे.ही शर्यत एक आदत एक बैल मैदान अशी होणार असून नियम व अटी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत.बैलगाडा मालकांना या शर्यतच्या निमित्ताने मोठी पर्वणी उपलब्ध होणार आहे.
या बैलगाडा शर्यतीमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्याकडून प्रथम बक्षीस रु. ५१ हजार असणार आहे.वाशिंबचे माजी उपसरपंच अमोल पवार व चेअरमन सचिन कानगुडे यांच्याकडून द्वितीय बक्षीस ३१ रु. हजार आहे. मा. सतीश कानगुडे व मा. सुधीर आवटे यांच्याकडून तिसरे बक्षीस २१ हजार रु. असणार आहे.मा.उपसरपंच संदीपान कानगुडे यांच्याकडून चतुर्थ बक्षीस रु ११ हजार असणार आहे.चेअरमन शुभम कानगुडे यांच्याकडून पंचम बक्षीस रु ७ हजार रु असणार आहे.मा.भैय्याराज गोसावी यांचेकडून सहावे बक्षीस रु. ५ हजार असणार आहे. चेअरमन भारत चोपडे यांचेकडून सातवे बक्षीस रु. ५ हजार रु असणार आहे.झेंडा पंच म्हणून माळशिसर येथील श्री. पप्पू मंडलिक तर समालोचन संपत वाघमोडे हे असणार आहेत.संपूर्ण बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण शर्यत अड्डा या युट्युब चॅनेलवर असणार आहे.
या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी उपलब्ध असून प्रवेशाफी रु. ७०० असणार आहे. नावनोंदणी व इतर सविस्तर माहितीसाठी पै. लखन शिंदे,कृष्णा घनवाट आहेत. तरी या बैलगाडा शर्यतिचा जास्तीत जास्त लाभ पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी घ्यावा असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठान, देवळाली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल