एग्रिस्टॅक फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र,सरकारी योजना सुरु राहण्यासाठी शेतकऱ्यांनी सदर आयडी काढून घ्यावा :- नितीन झिंजाडे
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा, प्रतिनिधी:- केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी सुरु असणाऱ्या सरकारी योजना कायम सुरु राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला "एग्रिस्टॅक" फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन करमाळा भाजपचे सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केले आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कि,भाजपा सरकारने योग्य शेतकऱ्यांना अचूक मदत करण्यासाठी अग्रीस्टक योजना म्हणजे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याची योजना आणली आहे.ज्या शेतकरी खातेदाराच्या ७/१२ वर जेवढी नावं आहेत त्या सर्व शेतकर्यांनी ही नोंदणी ऑनलाईन सेंटर वर करणे आवश्यक आहे.यासाठी आधार कार्ड,आधारकार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर(ओटीपी साठी), आपल्या नावावर असणाऱ्या सर्व गट नंबर ची माहिती(७/१२ उतारा) आदी कागदपत्रे आवश्यक आहे.ज्याप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड आहे त्याचप्रमणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे ऍग्रीस्टक फार्मर आयडी असणार आहे.७/१२, शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या लाभासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक असणार आहे.
पिएम किसान व नमो शेतकरी अंतर्गत लाभ,पिक विमा,पिक कर्ज,कृषी विषयक सर्व लाभाच्या योजना,नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती व पिक नुकसान भरपाई,जमीन खरेदी विक्री,कर्ज माफी,महाडीबिटी योजना व भविष्यात सर्व शेती विषयक सरकारी योजनाच्या लाभासाठी हा ऍग्रीस्टक फार्मर आयडी आवश्यक असणार आहे.शेती संबधित सरकारी योजनाच्या लाभाकरिता फार्मर आय डी यापुढे मागवला जाणार आहे.त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांकडे ऍग्रीस्टक फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
हे नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला,आपल्या घरातील ज्यांचे नावावर जमीन आहे अशा सर्वांचा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बनवून घ्यावे असे अवाहन नितीन झिंजाडे यांनी शेवटी केले आहे.