गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मा.खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर क्रिडा संकुल,आधूनिक व्यायाम शाळेचे करमाळा येथे उद्गाठण

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे रविवार दि. ३० रोजी मा.खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर क्रिडा संकुल,आधूनिक व्यायाम शाळेचे उद्गाठण करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे हस्ते होणार असलेची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि,श्री खंडोबा मंदीर शेजारी,पांडे रोड,देवीचामाळ, करमाळा येथे गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वात भव्य क्रीडा संकुल उभे राहत असून या ठिकाणी माल्लाना आधुनिक व्यायाम शाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या व्यायाम शाळेत मल्लाना मॅट (गादी)वरील कुस्ती,लाल मातीवरील कुस्ती,आधुनिक व्यायाम साहित्य असणारी जिम उपलब्ध होणार आहे.या ठिकाणी मल्लाना राहण्यासह व इतर पूरक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या मल्लाना डबल महाराष्ट्र चॅम्पियन पै.अफसर(तात्या) जाधव हे प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत.या व्यायाम शाळा उद्गाठण कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व मल्ल व कुस्ती प्रेमींना निमंत्रण दिल्याचे पै.अफसर तात्या जाधव यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल