मामाचे-गाव पोथरे माझा जिव्हाळ्याचा विषय,मूलभूत समस्या सोडवणार :विधनापरिषद सभापती प्रा.राम शिंदे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी :- माझ्या मामाचे गाव पोथरे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे या गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासा आपण आवश्यक ती मदत करणार असेलचे आश्वासन राज्य विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले आहे. राज्य विधानपरिषद सभापतपदी निवड झाल्याबद्दल पोथरे ग्रामपंचायत वा ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सन्मान आज मौजे पोथरे येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,
पोथरे गावात मी लहानपणी शाळेत असताना शिक्षणासाठी पाच वर्षे राहिलो,यामध्ये पोथरे जि.प. शाळा वा महात्मा गांधी हायस्कूल येथे आपण शिक्षण घेतले आहे.माझ्या दोन भगिनींही याच गावात दिल्या आहेत.त्यामुळे पोथरे गावातील एक अख्खी पिढी माझ्या परिचयाची आहे. येथील शनी मंदिर साडेतीन शक्तिपीठापैकी एक असून त्यातील एक पीठ इथं आहे.गावाच्या विकासाठी आवश्यक असेल तिथं आपण येत्या काळात शासकीय पातळीवर मदत करणार असलेचे त्यांनी यावेळी सांगितले.आदिनाथ महाराज संगोबाची यात्रा यासह गेल्या ४५ वर्षांपूर्वीच्या अनेक घटनाना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
यावेळी बोलताना करमाळ्याचे आमदार नारायण पाटील म्हणाले कि, रिटेवाडी उपसा सिंचन योजना,आदिनाथ सहकारी साखर कारखाना यासह आवश्यक त्या ठिकाणी मदत करण्याची विनंती त्यांनी प्रा.राम शिंदे यांना केली.यावेळी पोथरे गावात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये
  भाऊसाहेब झिंजाडे (कृषी),
आकाश ठोंबरे (शिक्षण),
प्रमोद झिंजाडे (समाजसेवा),
किशोर शिंदे (पत्रकारिता),
सुधीर झिंजाडे(उद्योग),
हरिभाऊ हिरडे(साहित्य),
उषा आढाव(स्वावलंबी महिला),
गौतम शिंदे (क्रीडा) यांना यावेळी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण आबा पाटील,भारतीय जनाता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, ऍड राहुल सावन्त,भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सरचिटणीस नितीन झिंजाडे,बाळासाहेब कुंभार,पिआय विनोद घुगे,पोलीस पाटील संदीप पाटील,माजी सरपंच सोपान शिंदे, विष्णू रंदवे,विठ्ठल शिंदे,पारजी शिंदे,अंगद देवकते,जयज्रथ शिंदे,जयज्रथ झिंजाडे, आजिनाथ झिंजाडे,दत्ता हिरडे,रामकृष्ण नायकोडे, हरिभाऊ झिंजाडे,श्रीराम खराडे,प्रसाद कुलकर्णी,दत्तात्रय वाळुंजकर,सुरेश शिंदे,माया शिंदे,नूतन शिंदे,राणी झिंजाडे,मनीषा पाटील,संगीता पाटील,योगिता शिंदे,रंजना ठोंबरे,शोभा झिंजाडे यासह शाळकरी विद्यार्थी, शिक्षक व शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे यांनी केले,सूत्रसंचालन हरीश कडू केले तर सर्वांचे आभार भाजपचे सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल