शेलगाव क येथील तन्मय काटुळे कर सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम ...

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा प्र. :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट) परीक्षेत करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव क येथील तन्मय काटुळे याने ३०२ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तन्मय काटुळे याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण करमाळा येथील नगरपरिषद शाळेत, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे कर्जत येथील श्री अमरनाथ विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय झाले. त्यानंतर त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी येथे एग्रीकल्चरल इंजीनियरिंग (Agril.Engg) ही पदवी प्राप्त केली.या यशामध्ये आई, वडील यांच्यासह मित्र परिवार व नातेवाईक , ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे तन्मय याने शेवटी बोलताना सांगितले. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)