जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा करमाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा (दि.27जाने) :- जगद्गुरु नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगणात करमाळा येथे आज (दि.27) रोजी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी नऊ वाजता जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकाचे आगमन करमाळा येथील छत्रपती चौक येथे झाले.यानंतर श्रींच्या पादुकाची भव्य मिरवणूक करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त शिष्य साधक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पादुकाचे आगमन झाल्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नामाचा गजर करण्यात आला.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 27 गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीनची वाटप यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन दिग्विजय बागल,जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील,विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे सर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर,करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डाॅ गजानन गुंजकर,सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर,मा.नगरसेविका संगीताताई खाटेर,माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे,नगरसेवक सचिन घोलप,भाजप तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे,किसान मोर्चा जिल्हा नरेंद्रसिंह ठाकुर,उद्योजक अमर साळुंके,भाजप उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी,शिवसेना शहराध्यक्ष अंकुश जाधव,सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांची विशेष उपस्थिती होती.पादुका पुजन करून शेकडो भाविकांनी उपासक दिक्षा घेतली.या पादुका दर्शन सोहळ्याला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त शिष्य साधक भाविक भक्त नागरिक महिला पुरुष बालगोपाळासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिंदे जिल्हा सचिव मारुती भोसले सोलापूर महिला अध्यक्ष सौ सविताताई परांडे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष देविदास ननवरे, सोलापूर जिल्हा कर्नल अशोक केळकर, दौरा प्रमुख गणेश पाचर्णे पश्चिम महाराष्ट्र पीठ सह प्रमुख अमोल कुलकर्णी,करमाळा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले, माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके,महिला तालुकाध्यक्ष सौ रोहिणी सरडे, विशेष कार्यवाहक संतोष हंडाळ व स्व स्वरूप सांप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समितीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या