सोमवार,दि.२७ रोजी करमाळा येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम)यांचा पादुका दर्शन सोहळा सोमवार,दि.२७ रोजी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती स्व-स्वरुप संप्रदायाच्या वतीने सांगण्यात आली आहे.
या सोहळ्याची सुरवात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांच्या पादुकांची सकाळी ९ वाजता शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर पादुकांचे संतपीठावर आगमन होणार आहे. या निमित्ताने निराधार व गरीब २७ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे.
गुरुपूजन,आरतीपूजन,प्रवचन,उपासक दिक्षा,दर्शन, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम दिवसभर होणार आहेत.
🟣जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
💥रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला संस्थानच्या वतीने ५३ रुग्णवाहिका महाराष्ट्रभर मोफत सेवा देत आहेत.त्याचा गोरगरिब रुग्णांना फायदा होत आहे.
💥संस्थानच्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत एक लाख रक्तदानाचा संकल्प होता विक्रमी १ लाख ३६ हजार २७० बाटल्या रक्त संकलित करुन ते गोरगरिब रुग्णांना देण्यात आले.या प्रकारचे विविध उपक्रम संस्थानच्या वतीने राबविले जातात.
या सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाणार आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन स्व-स्वरुप संप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.