करमाळा तालुक्यात राजकीय खळबळ;गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश धक्कादायक पद्धतीने राज्य पातळीवरून आले आहेत,यामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांसह जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांना पक्षविरोधी कारवाई बद्दल पक्षाने निष्कासित केले होते.भाजपाचे प्रदेशाशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदरची कारवाई स्थगित करून सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत,याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.यामुळे गणेश चिवटे यांच्या राजकीय विरोधकांनी भाजपा पक्षसंघटना ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती,त्यांना आता जोरदार चपराक बसली आहे. याबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, आम्ही गेली वीस वर्षे भाजपाचे काम निष्ठेने केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ.चंद्रकांत दादा पाटील,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवला व पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय केले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत .राज्यात व केंद्रात भाजपा महायुतीची सत्ता आहे त्यामुळे येत्या काळात करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहून जास्तीत जास्त विकासनिधी आणणार आहोत असेही चिवटे यांनी शेवटी सांगितले,

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)