दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - गणेश चिवटे

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्री गणेश चिवटे यांनी दिली आहे.दूध खरेदी दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रु.अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.यापैकी पहिल्या टप्प्यात ११ जानेवारी ते १० मार्च असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा झाले आहे.मात्र दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा होणे बाकी होते.यानुसार दुसऱ्या टप्प्या तील जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.यापैकी जुलै महिनयातील दुधाचे अनुदान आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
परवा झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार या दूध अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रु. ऐवजी आता ७ रु. प्रतिलिटर अनुदान मिळणार आहे.
  नवीन अनुदान योजना एक आक्टोबर पासून लागू होणार आहे.सदर दुधाचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आपण महसूल व दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार हे अनुदान जमा झाला आहे.गणेश चिवटे यांनी केलेल्या या पाठपुराव्याला मोठ यश येऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे यामुळे दूध शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)