भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात किसान मोर्चाच्या पदाधिकारी निवडी संपन्न
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा भाजपा किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज भाजपा कार्यालयात संपन्न झाल्या.भाजपाचे तालुका अध्यक्ष मा.श्री रामभाऊ ढाणे व किसान मोर्चा तालुका अध्यक्ष मा.श्री सोमनाथ घाडगे यांच्या हस्ते भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष म्हणून श्री. जयसिंग भोगे(अर्जुननगर),श्री. शिवाजी नाळे,(विहाळ),श्री .गणेश परदेशी,(अंजनडोह) तसेच तालुका सरचिटणीस पदी श्री.हर्षद शिंगाडे, (धायखिंडी) आणि
तालुका सचिव पदी श्री.बाबुराव गायकवाड,(पोटेगाव),श्री.गणेश वाळुंजकर,(पोथरे),श्री. मोहन नेटके(फिसरे),श्री. बापू मोहोळकर, (गुळसडी) आदी पदाधिकऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यावेळी भाजपा नेते गणेश चिवटे,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस नितीनभाऊ झिंजाडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या