भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या निवडी संपन्न

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपा कामगार आघाडीच्या करमाळा तालुक्याच्या निवडी संपन्न झाल्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष मा.रामभाऊ ढाणे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश माने यांनी या निवडी करमाळा भाजपा संपर्क कार्यालयात जाहीर केल्या.
यामध्ये कामगार आघाडीच्या तालुका सरचिटणीसपदी श्री. सतीश लक्ष्मण कोल्हे - पांडे व श्री. सुनील रघुनाथ आलाट - रोशेवाडी यांची निवड केली तर कामगार आघाडीच्या सोशल मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी श्री. विठ्ठल मंडलिक - रायगाव व उपाध्यक्षपदी दादासो संभाजी कडू- पोथरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आग्रवाल, करंजे ग्रामपंचायतचे सरपंच काकासाहेब सरडे, सरचिटणीस नितीनभाऊ झिंजाडे, संजय किरवे, नितीन कांबळे, गणेश झिंजाडे, ऋषी निंबाळकर, ज्ञानेश्वर कडु ,शरद यादव ,उमेश झिंजाडे,मयूर आलाट, विठ्ठल आलाट,शुभम गोरे,जयकुमार चव्हाण,गणेश कांबळे, दादा चव्हाण, दत्ता शिंदे, राजु पवार,लखण पवार ,तानाजी पवार,दादा पवार ,प्रविण कांबळे,सचिन पवार ,राजेंद पवार ,भाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते,

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)