लोकसभा परभवामुळे खचणार नाही,माढा लोकसभेत भाजपा अधिक मजबूत करणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा लोकसभेत लवकरच करणार मतदार आभार दौरा)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
फलटण :- माढा लोकसभेतील परभवामुळे खचुन न जाता माढा लोकसभेत भाजपा पक्ष अधिक जोमाने मजबूत करणार असलेची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी श्री निंबाळकर यांना हल्ली फलटण येथे भेटली तेव्हा ते बोलत होते.कार्यकर्त्यांशी अधिक बोलताना ते म्हणाले की, माढा, करमाळा मधील मतदारांचा कौल अनपेक्षित आहे.या परभवाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांनी यासंबधी आपल्याला कॉल करून अस्थेने विचारपूस केली आहे.दिल्लीस्थित शपथविधील त्यांनी स्वतः निमंत्रण दिले होते.आपण लवलरच माढा मतदारसंघात मतदार कृतज्ञता दौरा करणार असलेचे त्यांनी सांगितले.पक्षातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असलेचेही त्यांनी सांगितले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,शहराध्यक्ष जगदीश अगरवाल,माढा लोकसभा सोशल मीडिया संयोजक नितीनभाऊ झिंजाडे, बिटरगाव श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,जिल्हा चिटणीस विनोद महानावर,ता. उपाध्यक्ष जयंत काळे पाटील,आदिनाथ सुरवसे, कपिल मंडलिक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल