खा.निंबाळकरांची करमाळ्यात निघणार हत्तीवरून विजयी मिरवणूक (ऐनवेळी अनेकांनी साथ सोडूनही जनमताच्या जोरावर निंबाळकर पुन्हा विजयश्री आणणार खेचून)
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- लोकसभा निवडणुकीचे देशात वाहणारे वारे आता अंतिम टप्प्यात आले आहे.सर्वच एक्झिट पोलने केंद्रात भाजपचे सरकार येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत असे वर्तवले आहे.माढा लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक मोठी चुरसीशी ठरली.सुरवातीला खा.निंबाळकर यांच्यासमोर उमेदवार मिळेना अशी विरोधकांची अवस्था होती.धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून विरोधात उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत कमालीची चूरस निर्माण झाली.
खा.निंबाळकर यांनी मतदारसंघातील विकासकामासाठी भरघोस निधी खेचून आणल्याने निंबाळकर म्हणजे कामाचा माणूस म्हणून त्यांनी आपली छाप मतदारावर पाडली.मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यात त्यांनी पहिली लढाई जिंकली आता ४ जून रोजी निकालात ते विजयाची दुसरी लढाई जिंकणार आहेत असे सध्याचे चित्र आहे.मतदानानंतर मोहिते समर्थक फारच जोशात होते.लाखाच्या लीडची त्यांची भाषा हजारात आली आणि कालच्या एक्झिट पोलने तर त्या सगळ्यांची बोलतीच बंद केली आहे.एका मोहिते समर्थकाने चक्क ११ बुलेट ची पैज लावून वातावरण ढवळून काढले तर खा.निंबाळकर समर्थक श्री.अनुप शहा यांनी हे अवाहन स्विकारून २२ बुलेट ची पैज लावली.मतदारसंघातील वास्तविक परिस्थिती ओळखून मोहिते समर्थक यांनी या पैजेतून चक्क माघार घेतली इथेच खा.निंबाळकर यांचा विजय निश्चित झाला.
यानंतर भाजपचे माढा लोकसभा सोशल मीडिया संयोजक राणी व नितीन झिंजाडे यांनी सपत्नीक करमाळ्याची कुलस्वामिनी श्री कामलाभवानी मातेकडे खा.निंबाळकर यांच्या विजयासाठी साकडे घातले आहे.करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथील भाजपचे कार्यकर्ते ईश्वर मोरे यांनी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली खा.निंबाळकरांच्या विजयांनतर करमाळ्यात हत्तीवरून मिरवणूक काढणार असलेचे जाहीर केले आहे.या निवडणुकीत खा.निंबाळकर यांची ऐन वेळी अनेकांनी साथ सोडली पण जनभावना ही त्यांच्यासोबत असल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असलेचे सध्याचे चित्र आहे.