समाजकारण व राजकारण यांचा उत्तम मेळ घालणारे जनसेवक : गणेश(भाऊ) चिवटे
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
🟣स्पेशल रिपोर्ट
परिचय
शालेय जीवनापासून संघटनात्मक व सामाजिक कार्याची आवड असल्याने अनेक राजकीय पदावर त्यांनी काम केले. यामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक व जिल्हा नियोजन समिती सदस्य अशी अनेक राजकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत, याला सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबणारे तसेच समाजकारण व राजकारण यांचा उत्तम मेळ घालणारे जनसेवक,युवा नेतृत्व माननीय श्री. गणेश नागनाथ चिवटे अशी त्यांची
ओळख त्यांनी स्वकर्तृत्वावर तयार केली आहे.
🟣बजरंग दल तालुका संयोजक ते जिल्हा नियोजन समिती सदस्य
2001 पासून विश्व हिंदू परिषद/ बजरंग दल तालुका संयोजक ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडात असताना गो संरक्षणाचे मोठे अभियान उभारले.याची दखल घेत संघटनेने त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या पंढरपूर विभाग बजरंग दल जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी दिली,या मजबूत संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी या विचारांना ताकद देण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी गरजेची ठरते हे लक्षात घेऊन 2009 पासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कामास सुरुवात केली.2010 साली भाजपा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. 2011 साली झालेल्या करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या कमळ चिन्हावर सर्व उमेदवार उभे करून ते नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी विजयी झाले. पुढे बांधकाम समितीचे सभापती म्हणून नगरपरिषदेवर जवाबदारी पार पाडली.युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपाच्या 244, करमाळा-माढा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी भाजपा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडत आहेत.
🟣 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्याचा विकास
2023 साली सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने वीज, पाणी, रस्ते अशा विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणण्यास यशस्वी ठरले.
🟣 करमाळा तालुक्याच्या व्यावसायिक व आर्थिक क्षेत्रात मोलाचे योगदान
करमाळा तालुका शेतीवर अवलंबून आहे हे ओळखून तालुक्यातील शेतकरी व तरुणांना दूध व्यवसायास प्रोत्साहित केले. दूध व्यवसायाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देऊन हजारो शेतकरी व तरुणांना दूध व्यवसाय उभा करून दिला, आज रोजी जी.एन.सी मिल्क सेंटर संकलन केंद्राच्या माध्यमातून लाखो लिटर दूध संकलन केले जाते.यामुळे हजारो शेतकरी व शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला.
करमाळा शहर व तालुक्यात नव उद्योजक घडविण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज भासत होती हे लक्षात घेऊन 2003 साली श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आज संस्थेचे भाग भांडवल 5 कोटींच्या घरात गेले आहे त्यामुळे तालुक्यातील व शहरातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायिकांना आर्थिक सहकार्याची मदत संस्थेमार्फत होत आहे.
🟣 सामाजिक क्षेत्रात दानशूर व्यक्ती म्हणून लौकिक
सामाजिक काम म्हणून करमाळा तालुक्यात श्रीराम प्रतिष्ठानची स्थापना केली व प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना दररोज सायंकाळी मोफत भात-भाजी उपलब्ध करून दिली जाते.तसेच करमाळा शहर व तालुक्यातील गरजू निराधार वृद्ध नागरिकांना दररोज दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. तसेच गरीब, मजूर, शेतकऱ्यांच्या मुला मुलींची प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मोफत विवाह लावले जातात
सांगली पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील समस्येवर उपाययोजना म्हणून करमाळा तालुक्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने अन्न, वस्त्र (किराणा किट, पाणी, कपडे) अशा साहित्यांचे वाटप केले.कोरोना काळात रुग्णांचे होत असलेले हाल पाहून प्रत्यक्ष कोविड सेंटर मध्ये जाऊन आयुर्वेदिक काढा दिला,गरज असलेल्या रुग्णांना आपली राजकीय ताकद पणाला लावून रेमडिसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिले व अनेकांचे प्राण वाचवले,तसेच कोविड सेंटर मधील रुग्णांना व रोज मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांना दररोज घरपोच जेवन पोहोच देण्यात आले.
🟣तरुण पिढी निरोगी व सक्षम करण्यासाठी धडधड
करमाळा तालुक्यातील युवक निरोगी, निर्व्यसनी व सुदृढ असावा हा संकल्प मनात घेऊन दरवर्षी भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते, तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य अशा क्रीडा संकुलनाची उभारणी सुरू आहे. वाढदिवसानिमित्त खो- खो, कबड्डी, क्रिकेट अशा मैदानी खेळाचे आयोजन केले जाते