माढ्यात खा.निंबाळकर एक लाख पेक्षा अधिक मतांनी निवडून येतील: नितीन झिंजाडे

 (🚩रियल न्यूज नेटवर्क🔥)
करमाळा :- माढा लोकसभेत भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एक लाख मातापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा दावा भाजपचे नितीन झिंजाडे येथे केला आहे.करमाळा भाजपाचा बूथ अध्यक्ष व पदाधिकारी मेळावा प्रदेश उपाध्यक्ष सुनिलजी कर्जतकर यांच्या उपस्थितीत व भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी आयोजित प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाकडून एकतर्फी असणारी निवडणूकीत कमालीची चुरस आली.२०१९ निवडणुकीत समोर निवडणुक लढणारे आ. संजयमामा शिंदे व माढा लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,रासप,आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी आपल्यासोबत आहेत.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेच्या फलटण, माण खटाव, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या सर्व तालुक्यात सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते आदी लक्षवेधि कामे त्यांनी केली आहेत त्यामुळे प्रत्येक तालुक्यात आपण लीड घेणार आहोत. करमाळा तालुक्यात भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात गेली दोन वर्ष मेहनत घेत आहोत तालुक्यात कधी नव्हे एवढी भाजपा मजबूत झाली आहे. माळशिरस मध्ये आपण तेथील उमेदवाराला लीड घेऊ देत नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे खा. निंबाळकर हे एक लाख मतापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....