पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा : सुनील कर्जतकर (भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भव्य मेळावा संपन्न )

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले आहे.भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यात बूथ अध्यक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना कर्जतकर म्हणाले की,कार्यकर्ता ही भाजपाची ताकत आहे.आज गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यातून चांगल लीड मिळेल हा विश्वास आहे.आज देशात लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे.खा.निंबाळकर यांचे मत मोदींना मिळणार आहे.मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ फिरलो असून सर्वत्र वातावरण भाजपच्या बाजूने आहे त्यामुळे खा.निंबाळकर हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील.यावेळी बोलताना भाजपा नेते गणेश चिवटे म्हणाले की,खा.निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील रस्ते व पाण्याचे प्रश्नांची सोडवणूक केली आहे त्यामुळे खा.निंबाळकर यासारख्या कामदार माणसाला मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या मेळाव्यास भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल उपस्थित होत्या.यावेळी संतोष वाळुंजकर, संतोष कुलकर्णी, भगवानगिरी गोसावी,अमोल पवार,नितीन झिंजाडे आदींची भाषणे झाली.यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, सरचिटणीस काकासाहेब सरडे, डॉ. अभिजीत मुरूमकर, विनोद महानवर, पत्रकार दिनेश मडके, जयंत दळवी, सिध्दार्थ वाघमारे, राजु सय्यद , सरपंच प्रवीण बिनवडे, दौलत वाघमोडे, सोमनाथ घाडगे,उमेश मगर, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, रेणुका राऊत, राधिका डोके संगीता नष्टे, राजश्री खाडे , भैया गोसावी, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, जयसिंग भोगे, किरण शिंदे, विष्णू रंदिवे, हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार अजिनाथ सुरवसे यांनी केले.या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील भारतीय जनाता पार्टीचे पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल