दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा:माढ्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या लढाईत आमदार संजयमामा शिंदे यांच सारथ्य
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- होऊ घातलेलेल्या ४३ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीला करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे मोठ्या ताकतीने मैदानात उतरले आहेत.
"दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा"
या गीताच्या मतीतार्थाप्रमाणे माढ्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या लढाईत आमदार संजयमामा शिंदे यांनी सारथ्य स्वतःकडे घेतलं आहे.माढा लोकसभा मतदार संघाचा विचार करता करमाळा,माढा, माळशिरस,सांगोला,माण-खटाव,फलटण आदी तालुक्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. या निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांचा भक्कम पठिंबा मिळत आहे. हल्लीच करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण वाईज प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व करमाळा शहरात पदयात्रा काढून आ. संजयमामा शिंदे यांनी खा.निंबाळकरांच्या प्रचारार्थ जोरदार मुसंडी मारली आहे.
आ.संजयमामा व खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जिवलग मित्र या निवडणुकीच्या निमित्ताने हा याराना संजयमामा निभावताना दिसत आहेत.
यांच्या साथीला आ.जयकुमार गोरे,आ. बबनदादा शिंदे,आ.राम सातपुते,आ. शहाजी बापू पाटील, मा. आ. येळगावकर,मा.आ.जयवंराव जगताप,मा.आ.दीपकआबा साळुंखे, रश्मी बागल, गणेश चिवटे यासह अनेक मातब्बर नेते,कार्यकर्ते यांची साथ असणार आहे.
संजयमामा-खा.रणजितदादा या जोडगोळीने करमाळा तालुक्यात गत अडीच वर्षात जवळपास २००० कोटींची विकासकामे खेचून आणली आहेत.यामध्ये विविध रस्ते, पूल,हायवे जलसिंचन आदी विकासकामांचा समावेश आहे.अडीच वर्षाच्या कालावधीत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघतील प्रत्येक तालुक्यात खासदार म्हणून प्रत्येक क्षेत्रात भरीव काम,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाचे हजरो कोटींचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले आहे,तसेच मराठा व धनगर आरक्षनावर त्यांनी लोकसभेत आवाज उठवला होता.आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
याशिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रमुख उमेदवार म्हणून आमने सामने असलेले आ.संजयमामा-खा.रणजितदादा आता एकाच व्यापीठावर असल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदार संघात विजय हा हमखास असल्याने
आ.संजयमामा शिंदे हे खा.निंबाळकरांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाबतीत जायंट किलर ठरतील अशी चर्चा जनमानसात आहे.
टिप्पण्या