माढा लोकसभेत सामान्याचा मोदी परिवार विरुद्ध गर्विष्ठ मोहिते परिवार अशी लढत,१लाखाच्या फरकाने माढा लोकसभा जिंकण्याचा विश्वास : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर (रणजितदादा-संजयमामा या जोडगोळीला माजी आमदार जयवंतराव जगताप, गणेश चिवटे यांचीही खंबीर साथ)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- माढा लोकसभेत सामान्याचा मोदी परिवार विरुद्ध गर्विष्ठ मोहिते परिवार अशी लढत आहे.या निवडणुकीत सामान्य जनतेचा असणारा मोदी परिवार मोहिते परिवाराचे गर्वाचे घर खाली करून १लाखाच्या फरकाने माढा लोकसभा आपण जिंकणार असल्याचा विश्वास खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय, शेतकरी संघटना या महायुतीचे माढा लोकसभेचे उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची धडक्यात सुरवात झाली असून या प्रचाराची धुरा करमाळ्या आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे सारथ्य आहे रणजितदादा-संजयमामा या जोडगोळीला माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचीही खंबीर साथ मिळाली आहे.सावडी करमाळा येथे गट गण वाईज प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला व सायंकाळी करमाळा शहरात अभूतपूर्व पदयात्रा संपन्न झाली.
 यावेळी करमाळा शहरातील घराघरातून आमदार संजयमामा शिंदे व उमेदवार खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत सत्कार शेकडो नागरिकांनी केला.यावेळी महायुती मधील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय, शेतकरी संघटना आदींचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल