पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा माध्यमानी केला विपर्यास:माढ्यात खा.निंबाळकरांचे पारडे जडच,माढ्यासह सोलापूर ही महायुती जिंकणार
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- लोकसभेच्या निवडणुकीत आता रंग चढताना दिसत आहे.माढा लोकसभा मतदारसंघात महायुतिकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपामधून बंडखोरी करत महाविकास आघाडी कडून धैर्यशील मोहिते पाटिल यांनी अर्ज दाखल केला आहे.कार्यकर्ता बैठकीत सोलापूरचे सोलापूरची जागा अवघड व माढ्याची जागा कठीण असल्याचे वक्तव्य प्रसार माध्यमांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या तोंडी न बोलता घातले असल्याची बाब उघड झाली आहे.याबाबत माहिती देताना ते म्हणाले की,
भाजप कार्यकर्ता बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापूर व माढा लोकसभेत कार्यकर्त्यांना उद्देशून जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.यावेळी कार्यकर्त्यांना गाफिल न रहाता काम करावे,माढ्यात भाजप संघटनमंत्री असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका रात्रीत पक्ष बदलला असून त्यामुळे माढ्याची जागा कठीण दिसत असलेचे सांगितले. कठीण म्हणजे अशक्य असे नाही.माढा व सोलापूर या दोन्ही ठिकाणी भाजपची व महायुतीची मोठी ताकत आहे याशिवाय केंद्र व राज्य सरकारने गत १० वर्षेत लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभेत आ.राम सातपुते व माढा लोकसभेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांचा विजय निश्चित आहे असेही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यानी स्पष्ट केले आहे.