विधवा महिलांच्या हस्ते गुढीपाडव्याची गुढी उभारून त्यांना सन्मान द्यावा: प्रमोद झिंजाडे

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- विधवा महिलांच्या हस्ते गुढीपाडव्याची गुढी उभारून त्यांना सन्मान द्यावा असे आवाहन विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी नागरिकांना केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी गुढी पाडव्याचा सण आहे. या दिवशी प्रत्येक घरी गुढी उभारून सण साजरा केला जातो.तेव्हा गुढी पाडव्याच्या सणाला विधवा महिलांच्या हस्ते गुढी उभारून सन्मान करण्यास प्राधान्य देऊन सहकार्य करावे.हा उपक्रम गावा गावात राबविल्यास एका गावातून वीस विधवा महिलांना संधी दिली तर ३५,००० छोटी मोठी खेडी व नगरपरिषद. नगरपंचायत. महानगरपालिकेतील मिळून लाखो विधवा महिलांचा सन्मान होईल.तरी हा उपक्रम राबविण्यासाठी सुजाण नागरिक यांनी सहकार्य करून विधवा महिला सन्मानाच्या या लोकचळवळीस हातभार लावावा असे आवाहन या चळवळीचे प्रमोद झिंजाडे,राजू सिरसाठ.,डाॅ.मुक्तेश्वर मुुनशेेट्टीवार आदींनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)