करमाळा विधानसभा भाजपाची निवडणूक समितीची बैठक संपन्न
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - 244, करमाळा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी निवडणूक समितीची बैठक भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व विधानसभेच्या दृष्टिकोनातून बुथ शक्तीकरण व प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या यांचा आढावा घेण्यात आला.सर्वांनी विधानसभेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कामास सुरुवात करावी असे आदेशही पदाधिकारी यांना देण्यात आले,यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनिशी लोकसभा व विधानसभा निवडणुक लढणार असून आपण लोकसभे बरोबर विधानसभेची ही तयारी करणार आहोत व त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक दिलाने व एक मुखाने काम करावे, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचून त्याचा लाभ जनतेस मिळवून द्यावा. गरजू लोकांशी संपर्क करावा व त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले,या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या सांगितल्या तसेच संजय अण्णा घोरपडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले,
या बैठकीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते