खा.निंबाळकरांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडून खासदारकीच्या दुसऱ्या टर्म साठी शुभेच्छा

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
दिल्ली:- येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.
माढा मतदारसंघांमध्ये पाणी, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, एमआयडीसी आदी त्यांनी केलेल्या विकासकामाची संपूर्ण माहिती त्यांना दिली.यावेळी जे. पी. नड्डा यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या व यापुढील दुसऱ्या इनिंग मध्येही चांगले काम कारा,असा सल्ला श्री नड्डा यांनी दिला.
यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्ष संघटनेच्या कामाबाद्दलही माहिती दिली तसेच माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघांमधील सर्व सिंचन प्रश्न मार्गी लावले आहेत.
याशिवाय रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, एमआयडीसी ही कामे मार्गे लावण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे.तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्येही प्रश्न सोडवले आहेत.यापुढेही पक्ष संघटना व जनता यासाठी सातत्याने लोकसंपर्क ठेवून मतदार संघाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करणार आहे असे खासदार निंबाळकर यांनी श्री जे.पी. नड्डा यांना अश्वस्त केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)