मांगी,रिटेवाडी,रेल्वेसह अन्य नागरी सुविधा प्रामाणिकपणे मार्गी लावल्याचे समाधान : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळ्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न मांगी,रिटेवाडी,रेल्वेसह नागरी सुविधा प्रामाणिकपणे मार्गी लावल्याचे समाधान असल्याची माहिती माढा लोकसभा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली व दिलखुलास गप्पा मारल्या.यावेळी ते म्हणाले की,पारेवाडी रेल्वे स्टेशनवर चेन्नई एक्स्प्रेसला थांबा लवकरच मिळणार आहे.माढा, कुईवाडी, फलटण, जेऊर आदी रेल्वे स्टेशनचे पुनरूज्जीवन केले आहे.करमाळा-टेंभुर्णी रस्त्याचे मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे,करमाळा विधानसभा आमदार संजयमामा शिंदे हे महायुती सरकारमध्ये असल्याने आमच्यासोबत आहेत.करमाळ्यात पक्ष संघटना मजबूत आहेच आता बागल गटाच्या भाजपा प्रवेशाने भाजपाची ताकद वाढत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पक्षाच्या उमेदवारी बाबत बोलताना उमेदवारी कोणालाही दिली तरी पक्षाचे काम जोमाने करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.रिटेवाडी उपसा सिंचन आणि मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश याबाबत महायुतीचे सर्व पक्ष प्रयत्नशील असून केंद्र सरकारच्या वेबकॉस कंपनीकडून फेर जलनियोजनाच्या सर्वेचे काम सुरू असून कृष्णा खोरे विकास महामंडळाला त्याचा अहवाल आल्यानंतर या योजना लवकरच मार्गी लागतील, असा निर्वाळा त्यांनी दिला.करमाळा आगराला लवकरच आगाराच्या बसेस ३० ग्रीन बसेस ची मागणी आपण केली होती या बसेस ही लवकरच करमाळा वासियांच्या सेवेत दाखल होणार आहेत.मराठा आरक्षण बाबतीत आपण समाजाला वेळोवेळी पाठिंबा दिला असून सरकारने कुणबी दाखले द्यायला सुरु केले आहे.ज्याच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना राज्य सरकारने १०%आरक्षण दिले आहे. सगे सोयरे अध्यादेश सरकारने काढला असून हरकती पाहून त्यावरही निर्णय लवकरच होणार आहे.धनगर समाजाबाबतही केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून 'धनगड' व 'धनगर' हे शब्द एकच ठरवण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असून आपण याबाबत प्रायव्हेट बिल आणले होते.मराठा व धनगर आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण वयक्तिक भेट घेतली आहे असेही ते म्हणाले.तसेच करमाळ्यातून जाणारा जेऊर-चौंडी आष्टी रेल्वे मार्ग आगामी पंचवार्षिक मध्ये पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.यावेळी भाजपा माढा लोकसभा समन्वयक जयकुमार शिंदे,जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,तालुकाध्यक्ष राम ढाणे,सरचिटणीस काकासाहेब सरडे,शहराध्यक्ष जगदीश अगरवाल,युवक आघाडी जि.अध्यक्ष शंभूराजे जगताप,माढा लोकसभा संयोजक नितीनभाऊ झिंजाडे,अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....