राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळ्यामधील 7 जण विशेष रेल्वेने रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्याधामला

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळ्यामधील 7 जण विशेष रेल्वेने अयोध्याधामला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभहस्ते 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामलल्ला यांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.प्रभू श्रीराम मंदिराची ओढ भक्तांना लागल्याने प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
        विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकासाठी अयोध्या धाम श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 डब्याची 1440 प्रवासी संख्या असणारी विशेष रेल्वे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:00 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल सायंकाळी 9 वाजता नगर येथून मनमाड मार्गे निघेल.दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी श्री अयोध्या धाम येथे पोहोचेल.निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल.16 फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
         16 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर विशेष रेल्वे मनमाड दौंड पुणे मार्गे कोल्हापूर साठी निघेल. व दिनांक 18 तारखेला पुणे व कोल्हापूर येथे पोहोचेल.अयोध्या धाम येथे होणार्‍या दर्शनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळा येथून सात जणांची निवड करण्यात आली आहे यामध्ये 
प्रमोद फंड,अनंत मसलेकर,संघर्ष दयाळ,विनोद इंदलकर,विश्वजीत निंबाळकर,शुभम रोकडे,भुजंग गोरे
 वरील सात जणांना अयोध्या धाम येथील होणाऱ्या दर्शनासाठी विशेष पास ची सोय केली आहे.या सर्वांची जाण्याची सोय दौंड येथून करण्यात आली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....