मराठा विद्यार्थ्यांसाठी ४० लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर लवकरच व्याजमाफीची योजना: नरेंद्र पाटील. {अण्णासाहेब पाटील महामंडळाची विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना, लवकरच महायुती शासनचा निर्णय}


(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांची व्याजमाफी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतला आहे. या विषयासंदर्भातील राज्यातील महायुती सरकारचा निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारीदिली.याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर लागणारे व्याज महामंडळाने भरावे,अशी मागणी मराठा समाजबांधवांकडून करण्यात येत होती, या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बोर्ड बैठकीत मराठा विद्यार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्व करत असेल्या महायुती सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)