डिजिटल मिडिया पत्रकारांना राजमान्यता देऊन त्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार {डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही}

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
 कोल्हापूर :- डिजिटल मिडिया पत्रकारांना राजमान्यता देऊन त्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असेलची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.आज प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी व सामाजिक कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून देत आहेत, डिजिटल मिडिया क्षेत्राला शासनदरबारी स्वंतत्र दर्जा देऊन डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले,कोल्हापूर श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे आयोजित डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
या अधिवेशनासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती,राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे,खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास करमाळा जि. सोलापूर येथून तालुकाध्यक्ष दिनेश मडके सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, प्रसिद्धीप्रमुख अंगद भांडवलकर व्यवस्थापक सुर्यकांत होनप, कार्यकारणी सदस्य राहुल रामदासी नितीन झिंजाडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले तर आभार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी मानले.
🔵अजितदादांच्या दिलखुलास मुलाखतीत टाळ्या अन शिट्ट्या.....
    उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याची प्रकट मुलाखत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतली १ तास ५० अश्या प्रदीर्घ मुलाखतीत अजितदादांनी अगदी सडेतोड व स्पष्ट उत्तरे दिली, या मुलाखती दरम्यान राज्यातील घडामोडीवर व राजकीय हेवेदाव्यावर दादांनी दिलेली उत्तर ऐकून सभागृहात प्रचंड टाळ्या अन शिट्ट्या देखील होत होत्या.या मॅरोथॉन मुलाखतीचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व इलेकट्रॉनिक मिडिया व सर्व डिजिटल मिडिया मध्ये राज्यात व देशभर दाखविले गेले.
🔵 श्री सिद्धगिरी मठ कणेरी च्या अध्यात्मिक सहवासाची राज्यातील संपादक पत्रकारांना नवी प्रेरणा
       सिद्धगिरी मठ कणेरी च्या अध्यात्मिक सहवासाची राज्यातील संपादक पत्रकारांना नवी प्रेरणा मिळाली असून कणेरी येथील मठाच्या वतीने राज्यातील ३१ जिल्ह्यातून आलेल्या २ हजार संपादक पत्रकारांची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य वातावरणामध्ये अध्यात्माचा पदी स्पर्श लाभलेल्या या पावनभूमीमध्ये डिजिटल मीडियाचे अधिवेशन भव्य दिव्य आनंदही वातावरणामध्ये विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली डिजिटल मीडियाचे झालेले अधिवेशन पत्रकारांसाठी नवपर्वणी नवचैतन्य देणारे ठरले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....