करमाळा भाजपा कार्यालयात मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल फटाके फोडून, पेढे वाटून आंनदोत्सव साजरा
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळा भारतीय जनता पार्टी कार्यालयात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल पेढे वाटून व फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना पेढे भरवले. यावेळी बोलताना भाजपचे तालुका उपाध्यक्ष पै.रामभाऊ ढाणे म्हणाले की, स्व. आण्णासाहेब पाटील यांनी सुरु केलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आज मनोज जरांगे पाटील यांनी समाजाबरोबर सुरु केलेल्या जनरेट्यामुळे सुटला आहे. गेली ४० वर्ष आरक्षणाचा हा लढा सुरु होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार याबाबत सकारात्मक होते त्यामुळे या महायुती सरकारने हा प्रश्न अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात सोडविला आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे, घोटीचे माजी सरपंच सचिन राऊत,
वाशिंबे चे उपसरपंच अमोल पवार,भाजपाचे संजय घोरपडे, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे,
जयंत काळे पाटील, भैय्या गोसावी, चेअरमन दासाबापु बरडे, भरत चोपडे, राजेश पाटील,भरत गुंड, गणेश महाडिक, बालाजी जाधव, संदीप काळे, हर्षद झिंजाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते,