करमाळा अगारासाठी ६५ बसेसची पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्याकडे मागणी,लवकरच बसेस उपलब्ध होणार : गणेश (भाऊ)चिवटे {खा. निंबाळकरांनी ही घातले लक्ष}

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळा अगारासाठी ६५ नवीन बसेसची मागणी पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्याकडे यांचेकडे केली असलेची माहिती,भाजपचे जि. सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश (भाऊ )चिवटे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,करमाळा आगारात खूपच जुन्या, नादुरुस्त, धूर ओकणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर श्री चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील एस टी बसेसमुळे लोकांची होणारी गैरसोय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील वा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून देत नवीन ६५ बसेस उपलब्ध करून देणेची मागणी केली आहे.यामुळे करमाळा आगाराकडे सर्व चांगल्या तंदुरुस्त बसचा ताफा उपलब्ध होणार आहे.तसेच श्री चिवटे यांच्या मागणीप्रमाणे लवकरच नवीन बसेस उपलब्ध होतील असे आश्वासन पालकमंत्री वा खासदार महोदयानी दिले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)