ग्रामीण भागातील घरकुल योजनाचा निधी,शहरी घरकुल योजनेप्रमाणे २लाख ५० हजार रुपये करणेत यावा : नितीन झिंजाडे
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- ग्रामीण भागातील घरकुल योजनाचा निधी,शहरी घरकुल योजनेप्रमाणे २लाख ५० हजार रुपये राज्य सरकारने करावा अशी मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनामार्फत घरकुल योजना राबवली जाते.गरिबांना हक्काचे पक्के घर असले पाहिजे हे आपल्या शासनाचे धोरण स्तुत्य आहे.शहरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना २ लाख ५० हजार रु अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाते मात्र ग्रामीण भागासाठी घरकुल योजनेसाठी फक्त १ लाख २० हजार रु. अर्थसहाय्य दिले जाते.घरकुलासाठीच्या बांधकाम साहित्याचे दर हे सगळीकडे सारखेच असतात त्यामुळे ग्रामीण भागात शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेताना लोकांना त्रास होतो.काही लोक गरज असताना घरकुल बांधत नाहीत,काही लोक घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावर सोडतात. काही लाभार्थी तर घरकुल पूर्ण न केल्याने शासकीय कारवाईला सामोरे गेले आहेत.काही लाभार्थी यांनी घरकुल पूर्ण नं झालेले उचललेले पैसे शासनाला परत केले आहेत.यामुळे घरकुल बाबत शासनाच्या हेतू पूर्ण होत नाही त्यामुळे शासनाने शहरी व ग्रामीण असा भेद न करता सर्व प्रकारच्या घरकुल योजनाना एकसारखी रक्कम अनुदान म्हणून देण्याचा निर्णय मार्च २०२४ च्या अर्थसंकल्पात करावा अशी मागणी झिंजाडे यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती खासदार श्री.रणजितसिंह नाईक निंबाळकर व ग्रामविकास मंत्री ना.गिरीषजी महाजन यांना पाठवण्यात आल्या आहेत.