बिटरगाव श्री येथे विविध सरकारी योजनाची माहिती देणारी विकसित भारत यात्रा संपन्न : औषध फवारणी ड्रोनचे दाखवले प्रात्यक्षिक

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
बिटरगाव (श्री):- बिटरगाव श्री, ता. करमाळा येथे विकसित भारत यात्रा रथाचे उत्साहात स्वागत विद्यमान सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी led स्क्रिनवर केंद्र सरकारच्या विविध योजनाची माहिती यावेळी देण्यात आली, आयुष्यमान कार्डचे यावेळी वाटप करण्यात आले. विविध योजनाची माहितीपत्रकही वाटण्यात आली.उमेद प्रकल्पाच्या महिला गटाच्या सदस्या, शेतकऱ्यांना औषध फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. बिटरगाव श्री येथे विकसित भारत यात्रा संपन्न : औषध फवारणी ड्रोनचे दाखवले प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन या औषध फवारणी ड्रोनसाठी शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी कंपनी यांना भरघोस अससेली सबसिडी याची माहिती देण्यात आली.उपस्थितांना कॅलेंडर चे वाटप यावेळी करण्यात आले.हा कार्यक्रमासाठी ग्रामसेवक निकम,बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग कर्मचारी,घरकुल लाभार्थी,जि. प. शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, माजी सरपंच सुनीता मुरूमकर,माजी सरपंच संतोष वाघमोडे,माजी सरपंच महारुद्र दळवी, सामाजिक कार्यकर्ते बबन दादा मुरूमकर आदीसह बहुसंख्या ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला उपस्थित होत्या.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....