खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून खडकेवाडी फाटा ते खडकेवाडी गावठाण रस्ता मंजूर : गणेश चिवटे यांनी केले भूमिपूजन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून खडकेवाडी फाटा ते खडकेवाडी गावठाण रस्ता मंजूर झाला असून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी या रस्त्याचे आज भूमिपूजन केले आहे.मौजे देवळाली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खडकेवाडी येथे करमाळा - जेऊर हायवे पासून गावापर्यंत जाणारा मुख्य रस्ता हा अनेक वर्ष नादुरुस्त होता.त्यामुळे खडकेवाडी येथील शेतकरी,शाळकरी मुले यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.
28.50 लाख रुपये निधी दिल्यामुळे आता या रस्त्यामध्ये सुधारणा होणार आहे. गेल्या चार दिवसांपुर्वी चिवटे यांनी पिंपळवाडी येथे जिल्हा नियोजन मंडळामधून लोक उपयोगी असणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरणासाठी तीन लाख रुपयांच्या निधीच्या रस्त्याचे भूमिपूजन केले आहे , यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, झरेचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे,
किरण शिंदे, अजित शिंदे, प्रवीण शेळके, बंडू शेळके, कल्याण शेळके ग्रामपंचायत सदस्य, अशोक जाधव, शहाजी जाधव, भारत चौधरी, गोरख शिंदे, संजय चौधरी ग्रामपंचायत सदस्य, भैय्याराज गोसावी, पंकज बिचितकर, आजीनाथ शेळके, भागवत शिंदे, श्रीरंग शेळके, जांबुवंत शेळके,प्रज्वल जगदाळे, नवनाथ जाधव, संदीप शेळके, जोतिराम शेळके, अक्षय शेळके, तुळशीराम शेळके, इंद्रजित शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास जगदाळे, चैतन्य चौधरी, धनंजय शिंदे, वैभव चौधरी, सतीश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
टिप्पण्या