७० वर्षे काँग्रेसने देश फक्त लुटाला व पैसा खाल्ला,करमाळा भाजपा महिला आघाडी कडून काँग्रेस खासदारच्या भ्रष्टाचारचा निषेध

करमाळा :- (रियल न्यूज नेटवर्क-नितीनभाऊ झिंजाडे ) ७० वर्षे काँग्रेसने देश लुटाला व फक्त पैसा खाल्ला असा आरोप करत करमाळा भाजपा महिला आघाडी कडून काँग्रेस खासदारच्या भ्रष्टाचारचा निषेध केला.याबाबत करमाळा महिला भाजपा आघाडीच्या वतीने निषेध करत करमाळा तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे कुबेरलाही लाजवेल इतकी प्रचंड बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.३०० कोटिहून अधिक रोकड व इतर संपत्ती याचा यामध्ये समावेश आहे याचा निषेध देशभरातून होत आहे.नेता मालामाल व जनता बेहाल झाली असल्याचे या निवेदनात म्हटलं आहे तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला याचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.हे निवेदन देतेवेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा राजश्रीताई खाडे, शहराध्यक्षा संगीताताई नष्टे, जिल्हा कार्यकारणी सदस्या चंपावती कांबळे व भाजपाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....